News Flash

समाजवादी पार्टीच्या ‘या’ नेत्याची गोळी झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील मऊ येथे सकाळी घडली घटना, कारण अद्याप अस्पष्ट

(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशमधील मऊ येथे रविवारी सकाळी समाजवादी पार्टी (सपा) नेते बिजली यादव यांची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. मोहम्मदाबाद परिसरात बिजली यादव यांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारली, यानंतर हल्लेखोर फरार झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बिजली यादव हे सकाळी फिरायला निघाले होते, याचवेळी संधी साधुन हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्या डोक्यात गोळी मारून त्यांची हत्या केली. डोक्यात गोळी मारल्यागेल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खबबळ उडाली. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या वर्षाच्या शेवटी उत्तर प्रदेशमधील पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, त्याची तयारी बिजली यादव करत होते. स्थानिकांच्या मते राजकीय शत्रुत्वातून ही हत्या करण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 1:59 pm

Web Title: samajwadi party leader bijli yadav shot dead in muhammadabad msr 87
Next Stories
1 सुधारित नागरिकत्व कायद्यावरून राजकीय खेळ सुरू आहे : पंतप्रधान मोदी
2 जम्मू-काश्मीर : त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
3 CAA : जे गांधीजींनी सांगितलं त्याचं पालन आम्ही केलं – पंतप्रधान
Just Now!
X