News Flash

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना करोनाची बाधा

समाजवादीचे अध्यक्ष मुलायम सिंह यांच्या पत्नीलाही करोनाची बाधा

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना करोनाची बाधा झाली आहे. समाजवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. बुधवारी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीची करोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यांना करोनाची बाधा झाली आहे. दरम्यान मुलायम सिंह यांना करोनाची लक्षणं दिसत नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

ऑगस्ट महिन्यात मुलायम सिंह यादव यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना युरिन इन्फेक्शनही झालं होतं. दरम्यान एप्रिल महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना प्रकृती अस्वास्थ्य आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. आता त्यांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र लक्षणं नाहीत तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 10:29 pm

Web Title: samajwadi party leader mulayam singh yadav tests positive for coronavirus scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 युद्धासाठी तयार रहा, चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला आदेश
2 समलिंगी विवाह; सनातन धर्माच्या पाच हजार वर्षांत ही वेळ आली नव्हती – कोर्टात सरकारचा युक्तिवाद
3 ‘भाजपाला कोणाच्याही जीवाची किंमत नाही’; काँग्रेसचा #NoLivesMatterToBJP मधून हल्लाबोल
Just Now!
X