News Flash

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट : स्वामी असिमानंद यांना जामीन

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांना गुरुवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

| August 28, 2014 06:51 am

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांना गुरुवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. असिमानंद यांच्या वकिलांकडून जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्या. एस. एस. सरोन आणि न्या. लिझा गिल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
असिमानंद यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २६ डिसेंबर २०१२ रोजी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध पानिपतजवळ झालेल्या समझौता बॉम्बस्फोटप्रकरणी २६ जुलै २००७ रोजी गु्न्हा दाखल करण्यात आला. असिमानंद यांच्याशिवाय इतर तीन जणांवर हत्येचा आणि देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १२०-ब, ३०७, १२४-ए, ४३८ आणि ४४० नुसार या सर्वांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2014 6:51 am

Web Title: samjhauta blast accused swami aseemanand granted bail by high court
Next Stories
1 ‘तोपर्यंत बलात्कार होणार’; तृणमूलच्या आमदाराची मुक्ताफळे
2 आरोपी मंत्री नकोतच!
3 बलसाडमधील मंदिरातून साईबाबांची मूर्ती हलविली
Just Now!
X