स्मार्टफोन क्षेत्रात लोकप्रिय असलेली सॅमसंग कंपनी लवकरच स्मार्टफोन जगतात नवी क्रांती घडविण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरपासून सॅमसंग कंपनी घडी घालता येणारा(फोल्डेबल) स्मार्टफोनवर काम करीत आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या ‘डब प्रोजेक्ट व्हॅली’मध्ये सॅमसंगच्या या फोल्ड करता येणाऱया स्मार्टफोनच्या चाचण्या घेतल्या जात असून काम अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरूवातीला हा स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ शकतो, अशी अटकळ आहे. सध्या या मोबाईलची स्नॅपड्रॅगन ६२० आणि ८२० हे दोन प्रोसेसर वापरून चाचणी सुरू आहे. फोल्डेबल करता येणार्‍या या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी इतकी तगडी रॅम असणार आहे. या मोबाईलची स्नॅपड्रॅगन ८२० या प्रोसेसरवर चाचणी यशस्वी झाल्यास हा अद्ययावत प्रोसेसर कंपनीच्या आगामी गॅलक्सी एस७ मध्येही वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही स्मार्टफोनबाबत तंत्रप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे