भारतात करोनामुळे स्थिती बिकट झाल्याने अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वैद्यकीय उपकरणांपासून ऑक्सिजनपर्यंत पुरवठा अनेक देशातून होत आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दिग्गज मदतीसाठी पुढे आले आहेत. आता दक्षिण कोरियातील सॅमसंग कंपनीने भारताला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सॅमसंग कंपनी करोनाशी लढण्यासाठी ३७ कोटी रुपयांची मदत करणार आहे. ही मदत केंद्र आणि राज्य सरकारला दिली जाणार आहे. या पैशातून वैद्यकीय उपकरणं खरेदी करण्यास मदत होणार आहे. कंपनीने भारतातील स्टेक होल्डर्ससोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. सॅमसंगने सिटीजनशिप इनिशिएटिव्ह अंतर्गत ५ दशलक्ष डॉलरमधून ३ दशलक्ष डॉलर केंद्र सरकार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडु सरकारला देण्याची घोषणा केली आहे. तर उरलेल्या २ दशलक्ष डॉलरमधून वैद्यकीय उपकरणं पुरवणार आहे. यात १०० ऑक्सिजन कंन्सेट्रेटर्स, ३०० ऑक्सिजन सिलेंडर आणि १० लाख एलडीएल यांचा समावेश आहे. हे सर्व उत्तर प्रदेश आणि तामिळनाडुला दिले जातील.

करोनाच्या तावडीत जंगलाचा राजाही सापडला; हैद्राबादमधल्या ८ सिंहांना करोनाची लागण!

सॅमसंग कंपनीने मागच्या वर्षीही भारताला २० कोटी रुपयांची मदत केली होती. यात केंद्र सरकारसहित नोएडातील अॅडमिनिस्ट्रेशन सहभागी होतं. कंपनीने पीपीई किट आणि मास्क दिले होते.

“नेतृत्व आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती उद्भवली”, RBI माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचं टीकास्त्र

देशातील करोना रुग्णवाढ मंदावली असल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन लाख ५७ हजार २२९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ३ लाख २० हजार २८९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे नवीन रुग्ण आणि घरी परतलेले रुग्ण ही संख्या दिलासा देणारी आहे. मात्र, देशात दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कोणतीही घट झाली नसल्याचं दिसत आहे.