सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सॅमसंगच्या आगामी टॅबल्टेमध्ये इंटेलचा प्रोसेसर वापरणार असल्याचे जाहीर केले आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब ३ मध्ये १०.१ इंचाची स्क्रिन(१२८० x ८०० पिक्सेल) असून, यात इंटेलचा १.६ गिगॅहर्टझ ड्युएल-कोअर प्रोसेसर वापरण्यात येणार आहे. तसेच गुगल ‘इंक्स’च्या नव्या आवृत्तीचा अँड्रॉईड सिस्टम यात असणार आहे. गॅलेक्सी टॅब ३ या १०.१ इंचाच्या टॅब्लेटमध्ये ३जी आणि ४जी नेटवर्क कनेक्शन वापरता येईल. हा टॅब्लेट या महिन्याच्या अखेरिस सर्व बाजारपेठेत दाखल होणार असल्यची माहिती सॅमसंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली, तरी या टॅबलेटची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
सॅमसंगच्या याआधिच्या मोबाईल्स् मध्ये ब्रिटनमधील ‘एआरएम होल्डींग्ज’ कंपनीने कार्यक्षम-उर्जा तंत्रज्ञानाने विकसीत केलेल्या चीप्स(प्रोसेसर) वापरले आहेत. अॅपलने २००७ साली बाजारात आणलेले आयफोन आणि २०१० साली आणलेले आयपॅड याकडे लक्ष केंद्रीत करत, इंटेल या संगणक बनविणाऱ्या खासगी कंपनीने आता मोबाईलसाठी प्रोसेसर बनविण्याच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.