News Flash

चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपात प्रवेश

वीरप्पनच्या मुलीने पक्षप्रवेशानंतरच्या आपल्या भाषणात मोदींचाही केला उल्लेख

Veerappans Daughter Vidya Rani

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी विद्या राणी हिने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तामिळनाडूमधील कृष्णानगरी येथे पार पडलेल्या पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये विद्या राणीला पक्षाचे सदस्यत्व देण्यात आलं

भाजपाचे सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन यांच्या उपस्थित विद्या राणीने भाजपामध्ये प्रवेश केला. “कोणाचीही जात आणि धर्म न पाहता मला गरिबांसाठी आणि मागासवर्गातील लोकांसाठी काम करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लागू करण्यात आलेल्या सरकारी योजना सामान्य लोकांसाठी आहेत. मला त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायच्या आहेत,” असं मत पक्षप्रवेशानंतर बोलताना विद्याने व्यक्त केलं. “माझ्या वडीलांना निवडलेला मार्ग चुकीचा होता. मात्र त्यांनी नेहमीच गरिबांचा विचार केला,” असंही तिने आपल्या भाषणात म्हटलं.

वीरप्पनला विद्या राणी आणि प्रभा नावाच्या दोन मुली आहेत. त्यापैकी विद्या ही थोरली असून ती एक वकील आहे.

दहशतीचे दुसरे नाव वीरप्पन…

वीरप्पनचे किस्से आजही दक्षिणेमध्ये सांगितले जातात. १८ ऑक्टोबर २००४ साली पोलिसांनी वीरप्पनला ठार केलं. १८ जानेवारी १९५२ रोजी जन्म झालेल्या वीरप्पनने वयाच्या १७ वर्षी पहिली शिकार केली होती. एका हात्तीच्या कपाळावर गोळी मारत त्यांने आपली पहिली शिकार केली होती. वीरप्पनची दहशत इतकी होती की चंदन तस्करी करण्याच्या त्याच्या काळ्या धंद्याच्या आड येणाऱ्या अधिकाऱ्यांची तो हत्या करायचा. एकादा त्याने भारतीय वन सेवा अधिकाऱ्याची हत्या करुन त्याचे शीर कापले होते. तीन दशके वीरप्पनची दहशत दक्षिणेच्या जंगलांमध्ये होती. चंदनाबरोबरच तो हस्तीदंतांचीही तस्करी करायचा. २० वर्ष वीरप्पनचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांना त्याचा खात्मा करता आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 9:11 am

Web Title: sandalwood smuggler veerappans daughter vidya rani joins bjp scsg 91
Next Stories
1 …म्हणून मोदींच्या जय्यत तयारीनंतरही ट्रम्प भारत दौऱ्यात आवडत्या पदार्थाला मुकणार
2 असा असेल ट्रम्प यांचा 36 तासांचा भारत दौरा
3 Namaste Trump : ट्रम्प दाम्पत्याची ताजमहलला, डायना बेंचवर बसून फोटोसेशन
Just Now!
X