28 September 2020

News Flash

अटलजींबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्राध्यापकाला मारहाण

प्राध्यापक संजय कुमार यांनी फेसबुकवर अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली, त्यामुळे ही मारहाण करण्यात आली असे समजते आहे

फोटो सौजन्य - ANI

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप शुक्रवारी देण्यात आला. त्यांच्या जाण्याने देश हळहळला. अशात बिहारच्या महात्मा गांधी विद्यापीठातील प्राध्यापक संजय कुमार यांनी फेसबुकवर अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. ज्यामुळे त्यांच्यावर जमावाने हल्ला केला ज्यामध्ये झालेल्या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक संजय कुमार हे जेव्हा शुक्रवारी त्यांच्या घरी काम करत होते त्यावेळी त्यांच्यावर पाच जणांनी हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली.

माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरु अरविंद अग्रवाल यांचा हात आहे असा आरोप प्राध्यापक संजय कुमार यांनी केला आहे. फेसबुकवर पोस्ट करताना मी अटलजींना ‘संघी’ आणि ‘फॅसिस्ट’ म्हटले. मी माझे मत मांडले मला वाटत नाही यात काही गैर आहे. मात्र अरविंद अग्रवाल यांनी काही तरूणांची माथी भडकवली आणि माझ्यावर हल्ला करण्यास पाठवले असा आरोप संजय कुमार यांनी केला.

प्रा. संजय कुमार यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट

दरम्यान प्राध्यापक संजय कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरूणांचा निषेध करत राजदच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालयासमोरच्या रस्त्यावर भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. महात्मा गांधी विद्यापीठ हे भाजपाचे कार्यालय झाले आहे. भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यामुळेच मारहाण झालेल्या प्राध्यापकांची तक्रार पोलिसात नोंदवून घेतली जात नाही असाही आरोप राजदचे नेते मणिभूषण यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 9:13 am

Web Title: sanjay kumar a professor at the mahatma gandhi central university in motihari thrashed by a mob yesterday allegedly for sharing an fb post critical of atal bihari vajpayee
Next Stories
1 Kerala Floods: गच्चीवर उतरवलं हेलीकॉप्टर, नौदलाची मदतीची शर्थ
2 तुम्ही आता सोबत आहात, मला ठाऊक आहे; पूनम महाजन यांचे भावस्पर्शी ट्विट
3 गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकमध्ये भीषण धडक; ५ जण जागीच ठार
Just Now!
X