News Flash

रामाचे राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही, संजय राऊत यांचा मोदींना टोला

जय श्रीराम या बिहार निवडणूक प्रचारात मोदींनी दिलेल्या घोषणेवरुन टीका

रामाचे राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीरामचे नारे दिले. पण रामाचे राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चौदा वर्षे वनवास भोगून रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतल्याची आनंदवार्ता हनुमंताने भरताला सांगितली. इतर कुणामुळे आपल्यावर दुःख कोसळले असे समजणे चुकीचे आहे. अमके तमके मी करीन हा अहंकार फालतू आहे. तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते असं म्हणत त्यांनी अर्णब प्रकरणावरुनही भाजपाला सुनावलं आहे. आजच्या सामनातील रोखठोक या सदरात लेख लिहून त्यांनी ही टीका केली आहे.

आणखी काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
“दिवाळीचा सण यावेळी फिका जाईल असे वाटत होते. तो समज आपल्या लोकांनी ठरवून खोटा पाडला. करोनाची वगैरे पर्वा न करता खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत बहुदा करोना चिरडून मरेल असा विनोदही काही लोकांनी केला आहे. करोना आहे तसाच आहे. लोकांचे चिरडणे सुरु हे. दिवाळी सण साजरा करावा हे सगळ्यांनाच वाटते. ही परंपरा आहे. रामायण आणि महाभारत यातून अनेक सण-उत्सवांचा उगम झाला. दिवाळी, दसरा उत्सवही त्यातलेच. राम मंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय श्रीरामचे नारे दिले. पण रामाचे राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही. “

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 8:34 am

Web Title: sanjay raut criticized pm narendra modi on ramrajaya and corona scj 81
Next Stories
1 चिथावणी दिल्यास कठोर प्रत्युत्तर
2 ‘हुरियत’चे भारत-पाकिस्तानला काश्मीरबाबत चर्चेसाठी आवाहन
3 बायडेन यांच्यापुढे टाळेबंदीच्या निर्णयाचा पेच
Just Now!
X