05 March 2021

News Flash

सरबजितचे कुटुंबिय भारतात परतले; त्याची प्रकृती चिंताजनकच

पाकिस्तानात उपचार सुरू असलेला भारतीय कैदी सरबजितसिंगचे कुटुंबिय बुधवारी भारतात परतले. सरबिजतची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. सरबजितवरील उपचारांबाबत सल्ला घेण्यासाठी

| May 1, 2013 12:57 pm

पाकिस्तानात उपचार सुरू असलेला भारतीय कैदी सरबजितसिंगचे कुटुंबिय बुधवारी भारतात परतले. सरबिजतची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. सरबजितवरील उपचारांबाबत सल्ला घेण्यासाठी त्याचे कुटुंबिय भारतात परतले आहेत.
वाघा सीमेवरून सरबजितची बहिण दलबीर कौर, पत्नी सुखप्रित कौर आणि दोन मुलींनी बुधवारी सकाळी भारतात प्रवेश केला. सरबजितची प्रकृती खालावली असल्याचे लाहोरमधील जिना रुग्णालयाचे डॉक्टर मोहमद शौकत यांनी मंगळवारी सांगितले होते. सरबजित ब्रेन डेड झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी तसे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट केले. त्याची प्रकृती खालावली असली, तरी तो ब्रेन डेड झाला नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दलबीर कौर यांनी मंगळवारी लाहोरमधून त्यांच्या वकिलांना दूरध्वनी करून भारतात परतण्याबद्दल विचारणा केली होती. सरबजितवर उपचारांची दिशा ठरविण्यासाठी भारतातील डॉक्टर आणि राजनैतिक अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 12:57 pm

Web Title: sarabjits family returns to india his condition continues to be critical
टॅग : Sarabjit Singh
Next Stories
1 सरबजितला चांगल्या उपचारांसाठी परदेशात हलवा – भारताची पाककडे मागणी
2 चिनी घुसखोरीबद्दल लष्करप्रमुखांचे मंत्रिमंडळापुढे निवेदन
3 विश्वासार्हतेचाच ‘कोळसा’
Just Now!
X