सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने शारदा चीटफंड घोटाळ्याची चौकशी सुरू असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याचे  संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी सुरू असून, ती पूर्ण होईपर्यंत सक्तवसुली संचालनालयाला प्रतीक्षा करावी लागेल. आमच्या चौकशीतून गुन्ह्यांसंदर्भातील अनेक गोष्टी उलगडल्या आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणास आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
 सीबीआयमार्फत सुरू असलेली चौकशी पूर्ण झाली, की त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करू शकणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ३५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.