भाजपने शनिवारी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसामच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून ते पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत. आसाममध्ये निवडणुका होणार असून सोनोवाल यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुखपदही सोपविण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा करताना स्पष्ट केले की, हिमंत विश्वशर्मा या काँग्रेसच्या नेत्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्यासह पक्षात आलेले काँग्रेसचे अनेक आमदार या समितीचे निमंत्रक असतील. सोनोवाल हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का, असे विचारले असता जावडेकर यांनी त्याचे उत्तर देणे टाळले.