News Flash

आसामच्या मुख्यमंत्रीपदी सर्वानंद सोनोवाल विराजमान

शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते

सोनोवाल यांच्यासह हेमंत विश्व शर्मा, आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा, प्रमिला राणी ब्रह्मा, परिमल शुक्ला वैद्य यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांनी मंगळवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू यांचा समावेश आहे. मावळते मुख्यमंत्री तरूण गोगोई हे देखील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते.
सोनोवाल यांच्यासह हेमंत विश्व शर्मा, आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा, प्रमिला राणी ब्रह्मा, परिमल शुक्ला वैद्य यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह हे सुद्धा सोहळ्याला उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 5:38 pm

Web Title: sarbananda sonowal takes oath as cm of assam
Next Stories
1 …तर केजरीवाल मोदींसोबत हातमिळवणी करतील!
2 खासगी एअर अॅम्ब्युलन्सचे दिल्लीजवळ आपत्कालीन लॅंडिंग, पाच जखमी
3 दाऊदला लवकरच पकडून भारतात आणू- राजनाथ सिंह
Just Now!
X