News Flash

लोकप्रिय गायक सरदूल सिकंदर यांचे निधन

ते ६० वर्षांचे होते.

लोकप्रिय पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे आज निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, याच काळात त्यांना करोनाचा संसर्ग झाला. बुधवारी सरदूल सिकंदर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरदूल यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीमधील अनेक गाणी गायली आहेत आणि ती हिट देखील झाली होती. त्यांच्या निधनानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘दिग्गज गायक सरदूल सिकंदर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरु होते. पंजाबी संगीत इंडस्ट्रीचं आज खूप मोठे नुकसान झाले आहे,’ या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच कॉमेडियन कपिल शर्मा, दलेर मेहंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरदूल यांच्या निधनाची माहिती देत श्रद्धांजली वाहिली आहे.

सरदूल यांना दोन मुले आहेत. आलाप आणि सारंग सिकंदर. दोघेही संगीताच्या क्षेत्रात काम करत आहेत. सरदूल यांना लहानपणापासून गाण्याची आवड होती. त्यांनी १९८०मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘रोडवेज दी लारी’ लाँच केला होता. त्यांनी अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. त्यांनी पंजाबी चित्रपट ‘जग्गा डाकू’ मध्ये भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 5:24 pm

Web Title: sardool sikander dies punjabi singer songs covid 19 kapil sharma reacts avb 95
Next Stories
1 “नरेंद्र मोदी या देशातील सर्वात मोठे दंगाबाज; ट्रम्प यांच्यापेक्षाही….”; ममता बॅनर्जी आक्रमक
2 मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांच्या ‘आप’ ची एन्ट्री
3 २३ कॅरेट सोन्याची बिर्याणी; किंमत ऐकून फुटेल घाम
Just Now!
X