22 November 2017

News Flash

ओबामाकन्येची जांभई

जगभरातील प्रसारमाध्यमांचे कॅमेरे बराक ओबामांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यावर रोखलेले असताना त्यांची धाकटी कन्या साशा

पीटीआय, न्यूयॉर्क | Updated: January 23, 2013 2:16 AM

जगभरातील प्रसारमाध्यमांचे कॅमेरे बराक ओबामांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यावर रोखलेले असताना त्यांची धाकटी कन्या साशा हिने दिलेली जांभई नेमकी कॅमेरात टिपली गेली. आता या जांभईचेच छायाचित्र जगभरात चर्चेचा विषय बनले आहे.
बराक ओबामा यांनी सोमवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. आपल्या अध्यक्षीय भाषणादरम्यान ओबामा देशाचा आर्थिक गाडा पुन्हा मार्गाला कसा लागेल, त्यासाठी काय करावे लागेल, कोणती धोरणे राबवावी लागतील आदी मुद्दय़ांवर सविस्तर विवेचन करत असताना अकरा वर्षीय कन्या साशाने जोरदार जांभई दिली. साशाची ही जांभई कॅमेराबद्ध झाली आणि इंटरनेटवर तातडीने ती प्रसारित झाली. त्यावर आता अनेक टिप्पण्याही पडू लागल्या आहेत. भाषणानंतर मात्र साशाने बाबा ओबामांचे अभिनंदन केले. मागील भाषणापेक्षा यंदाचे भाषण अगदी सुंदर होते, मुख्यत ते रटाळ नव्हते अशी प्रतिक्रियाही साशाने नोंदवली!

‘उद्दिष्टांची पूर्तता करण्यास सज्ज होऊ या’
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेतील जनतेची आनंदी वृत्ती आणि त्यांच्या अंगात भिनलेला चांगुलपणा यांची स्तुती केली आहे. चार वर्षांपूर्वी जे उद्दिष्ट ठरविले आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे आश्वासनही ओबामा यांनी आपल्या समर्थकांना दिले आहे.
आपण जेथून सुरुवात केली त्याची पूर्तता करू या, असे ओबामा यांनी आपल्या समर्थकांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. ओबामा यांची दुसरी कारकीर्द २० जानेवारी रोजी सुरू झाली. मात्र त्या दिवशी रविवार असल्याने सर्व कार्यालये बंद होती. तथापि, सूत्रे स्वीकारण्याचा कार्यक्रम सोमवारी समारंभपूर्वक पार पडला.
आपल्या शपथेचे केवळ नूतनीकरण झाले आहे आणि ते शक्य केल्याबद्दल त्यांनी समर्थकांचे आभार मानले आहेत. हा तुमच्या अध्यक्षांचा सन्मान आहे. देशाला पुढे नेण्यासाठी आपण काँग्रेससमवेत असलेले मतभेद मिटविण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला.

First Published on January 23, 2013 2:16 am

Web Title: sasha obamas mighty yawn goes viral
टॅग Sasha Obama