गुजरात व पाकिस्तानमधील ठिकाणांहून थुरया सॅटेलाइट फोनवरून झालेल्या संभाषणाची मालिकाच उघड झाली आहे. सुरक्षा दलांनी हे संभाषण पकडल्याचा दावा केला असून त्यामुळे गृह मंत्रालयाला सतर्कतेचा इशारा मिळाला आहे. गुजरातच्या कच्छ भागातून पाकिस्तानातील एका विशिष्ट ठिकाणी संभाषण झाले आहे. सुरक्षा दलांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे कारण हे सगळे थुरया सॅटेलाइट फोनवरून झालेले संभाषण आहे. या फोनसेवेवर भारतात बंदी आहे. हे संभाषण दहशतवादी गटांशी संबंधित असल्याचे समजते. थुरया सॅटेलाइट फोन कंपनी संयुक्त अरब अमिरातीची असून युरोपसह ११० देशांत त्यांची सेवा आहे.
पोलिसांनी सांगितले, की कच्छ जिल्ह्य़ातील लखपत तालुक्यातील सियोट खेडे अधिसूचित क्षेत्रात येते. ते पाकिस्तान सीमेलगत आहे तेथून हे संभाषण झाले. आता या संभाषणाचा अधिक तपास चालू आहे.