राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना, आज राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व  नेते अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ईडीच्या या करावाईबद्दल ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“ईडी झालीय ‘ येडी ‘ ! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय.” अस सत्यजीत तांबे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आलं होतं. त्यामध्ये अनियमितता आढळली होती. या सगळ्याची चौकशी आता ईडीतर्फे केली जाणार आहे.