देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या ‘सत्यम कॉम्प्युटर्स’प्रकरणी हैदराबादमधील विशेष न्यायालयाने सोमवारी बी. रामलिंग राजू यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला . न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या खटल्यातील रामलिंग राजू यांच्यासह अन्य नऊ जणांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
यापूर्वी ९ मे रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने न्यायालयाने सर्व आरोपींना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. त्याचबरोबर रामलिंग राजू आणि त्याचा भाऊ रामा राजू यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये दंडही ठोठावला होता.