News Flash

मोदींची कूटनीती, भारतीयांच्या हज कोट्यात तब्बल ३० हजारांची वाढ

यामुळे आता दरवर्षी २ लाख भाविकांना हज यात्रा करता येणार आहे

सौदी अरेबियाने भारतीय मुस्लिमांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हज कोट्यात ३० हजारांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दरवर्षी हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या आता १ लाख ७० हजाराहून दोन लाखांवर पोहोचली आहे. या वर्षापासून ३० हजार अन्य भाविकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी हज कोट्यावर चर्चा झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

नरेंद्र मोदी सध्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने जपानमध्ये आहेत. द्विपक्षीय चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी मुहम्मद बिन सलमान यांच्यासबोत व्यापार, गुंतवणूक, दहशतवादविरोधी लढा अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माहिती दिली की, मोहम्मद बिन सलमान यांनी भारताचा हज कोटा १ लाख ७० हजारावरुन दोन लाख करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं असल्याची माहिती दिली. हे महत्त्वाचं असून, हे झालं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 5:25 pm

Web Title: saudi arabia crown prince mohammed bin salman haj quota pm narendra modi sgy 87
Next Stories
1 कारखान्यावर छापा मारायला गेले अन् पोहचले कोठडीत
2 अजब ! पत्नीने दारु प्यावी यासाठी कोर्टात पोहोचला पती
3 खुशखबर! रेशनचे नियम बदलणार; कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य मिळणार
Just Now!
X