News Flash

पाकिस्तानी ‘गो बॅक’!; सौदीने चार महिन्यांत ३९ हजार नागरिकांना हाकलले

पाक नागरिकांची 'कसून' चौकशी करण्याचे आदेश

अमेरिकेनंतर कुवेत सरकारने पाकिस्तानसह पाच मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली असताना, सौदी अरेबियातून गेल्या चार महिन्यांत तब्बल ३९ हजार पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केली आहे. त्यांना सौदीतून बाहेर काढण्यासाठी व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सध्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची कसून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सौदीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

गेल्या चार महिन्यांत सौदीत वास्तव्य आणि तिथे काम करण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३९ हजार पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे, असे सौदी सरकारने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. देशातील सुरक्षा यंत्रणांतील विविध पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काही पाकिस्तानी नागरीक ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय असल्याने सौदी सरकारसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरली होती. याशिवाय काही पाकिस्तानी नागरिकांना अंमली पदार्थांची तस्करी, चोरी, फसवणूक आणि हाणामारी आदी घटनांमधील आरोपांन्वये अटक करण्यात आली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शूरा काऊन्सिलच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष अब्दुला अल-सादो यांनी पाकिस्तानी नागरिकांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची योग्य ती चौकशी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहुन, सौदीमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची इत्यंभूत माहिती मिळवण्याच्ये आदेश अब्दुला यांनी दिले आहेत. तसेच कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाचा राजकीय आणि धार्मिक कल कोणत्या बाजूने आहे, हेही जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या नागरिकाला सौदी अरेबियात प्रवेश दिला जाऊ नये, असे स्पष्ट आदेश अब्दुला यांनी दिले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सात मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली होती. या देशांतील नागरिकांनी व्हिसासाठी अर्ज करू नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर कुवेतनेही पाकिस्तानसह पाच मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना व्हिसा देण्यास नकार देत प्रवेशबंदी केली होती. कुवेतने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2017 12:59 pm

Web Title: saudi arabia deports 39000 pakistanis in 4 months for visa violations
Next Stories
1 नोटाबंदीच्या तीन महिन्यांनंतरही ४ पैकी एका एटीएममध्ये कॅशची चणचण!
2 शशिकला यांना १३० आमदारांचे समर्थन; पनीरसेल्वम म्हणाले, विधानसभेत सिद्ध करेन बहुमत
3 तामिळनाडूत भाजपचा वेट अँण्ड वॉच गेम; मोदी आणि शहांकडून पनीरसेल्वम यांना पाठबळ
Just Now!
X