सौदी अरेबियाने परदेशी पर्यटक महिलांवरील बुरखा सक्ती हटवली आहे. पर्यटकांना आर्कषित करण्यासाठी सौदी अरेबियाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे. सौदीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबन कमी करून पर्यटनाला महत्त्व देण्यासाठी प्रिन्स सलमानने देखील व्हिजन २०३० ह्या उपक्रमाची देखील घोषणा केली आहे.

सौदी अरेबियाने विदेशी पर्यटक महिलांवरील बुरखा सक्ती हटवली आहे. सौदी पर्यटन आणि राष्ट्रीय वारसा समितीचे अध्यक्ष अहमद अल-खतिब यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. विदेशी पर्यटक महिलांनी बुरखा घालण्याची गरज नाही. मात्र योग्य प्रकारचे कपडे घालण्याची सूचना दिली आहे. शनिवारी, ४९ देशांचे नागरिकांना पर्यटक व्हिसासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, तर इतर जण दूतावास आणि परराष्ट्रातील दुतावासांमध्ये अर्ज करु शकतात, असे अल-खतिब यांनी रियाधमधील ब्लूमबर्ग टीव्हीला सांगितले आहे.

याआधी केवळ सौदीला नोकरीसाठी येणार्‍या लोकांसाठी, त्यांचे कुटुंबीय आणि मक्का-मदिनाला जाणार्‍या मुस्लिम यात्रेकरूंना व्हिसा देण्यात येत होता.

प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सत्तेत आल्यापासून महिलांना मोठ्या प्रमाणात आपले हक्क मिळाले आहेत. सरकारने तिथल्या कठोर नियमांपासून तेथील महिलांना सूट देण्यात आली आहे. अलीकडेच सौदी अरेबियाने महिलांना देखील परदेशात प्रवास करण्यासाठी कायदा केला आहे. महिलांना त्यांच्या पसंतीनुसार लग्न करण्याचीही परवानगी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच सौदीतील महिलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळण्याचा कायदा करण्यात आला आहे.