उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यातील तिघांची सौदी अरेबियातील रियाध शहरात हत्या करण्यात आली आहे. तिघांपैकी दोन जण भाऊ आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनानुसार, रियाधमध्ये या तिघांना नोकरी देणाऱ्या मालकानेच त्यांची हत्या केली आहे. नोकरीसाठी हे तिघे सौदी अरेबियाला गेले होते. पण आता त्यांचा मृतदेहच गावाकडे आणला जाणार आहे.
आझमगडचे पोलीस अधीक्षक रवीशंकर छब्बी म्हणाले की, तिघांचे मृतदेह देशात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन भाऊ रौनापारचे तर एक जण जियानपूरचा रहिवासी आहे. तिघेही नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेले होते. शफाकत (३५), शमीम (३२) आणि तिसऱ्या व्यक्तीचे नाव फय्याज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे तिघेही रियाधमध्ये वाहन चालकाचे काम करत होते. ही घटना सुमारे १२ दिवसांपूर्वी घडली आहे. शफाकत आपल्या मालकाला भेटायला गेला होता. त्यानंतर तिघांची हत्या झाल्याचे समोर आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 11:11 am