भारत दौऱ्यावर आलेले सौदीचे राजपूत्र महंमद बिन सलमान यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनात बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींचे विशेष कौतुक केले. मोदी माझे मोठे बंधू आहेत तर मी त्यांचा लहान भाऊ आहे असे सलमान यांनी सांगितले. दोन्ही देशांचे हित लक्षात घेताभारत-सौदी अरेबिया संबंधात आणखी सुधारणा झाली पाहिजे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत आणि सौदी अरेबियासाठी आपण खूप चांगल्या गोष्टी करु शकतो हा मला विश्वास वाटतो असे महंमद बिन सलमान म्हणाले.

त्यांचे राष्ट्रपती भवनात आज शाही स्वागत करतण्यात आले. महंमद बिन सलमान मंगळवारी रात्री उशिरा भारतात दाखल झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिष्टाचार बाजूला ठेवून स्वत:हा विमानतळावर जाऊन महंमद बिन सलमान यांचे स्वागत केले.

महंमद बिन सलमान अरब जगतातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. संरक्षण सहकार्य आणि नौदलाचा एकत्रित युद्ध सराव यासंबंधी दोन्ही देशांमध्ये काही करार होऊ शकतात. महंमद बिन सलमान दोन दिवसांपूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महंमद बिन सलमान यांचा भारत-पाकिस्तान दौरा खूप महत्वाचा आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर नरमलेल्या पाकिस्तानला आता सौदीने मध्यस्थी करावी अशी आशा बाळगून आहे.