गर्भपात केल्यामुळे मृत्यू झालेल्या सविता हलप्पनवार या भारतीय वंशांच्या दंतवैद्याचे पती प्रवीण यांनी अखेर आर्यलड सोडले. पत्नीच्या मृत्यूनंतर प्रवीण यांनी आर्यलडमध्ये गर्भपातासंदर्भात कायदा आणण्यासाठी प्रयत्न केले. आता ते अमेरिकेत वास्तव्य करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
सविता यांचा आर्यलडमधील गलवे विद्यापीठ रुग्णालयात गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यांचा गर्भपात केला नसता तर त्यांचा मृत्यू झाला असता, असे डॉक्टरांनी सांगितल्याने त्या आणि त्यांचे पती गर्भपातास तयार झाले. मात्र तरीही त्यांचा मृत्यू झाला. आर्यलडमध्ये गर्भपातासंदर्भात कोणताही कायदा नाही. सविता यांचा गर्भपात केला नसता तर त्या वाचल्या असत्या असा दावा करीत, प्रवीण यांनी या संदर्भात सरकारी पातळीवर प्रयत्न केले.
अखेर आर्यलडमध्ये हा कायदा होण्याच्या मार्गावर आहे.