23 October 2020

News Flash

‘क्यूँकी ये सडक किसीके बाप की नहीं?’ अक्षयच्या जाहिरातीमागील कल्पना या मराठमोळ्या तरुणीची

या जाहिरातीतील 'रोड किसी के बाप का नहीं,' हा संवाद खूप गाजला. अक्षयच्या या जाहिरातींची ट्विटर आणि फेसबुकवरही चर्चा आहे.

वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी या उद्देशाने सायली कुलकर्णी हिने तिच्या तीन साथीदारांच्या संकल्पनेतून एक मोहिम राबवण्यास सुरूवात केली. या मोहिमेत तिला परिवहन विभागाचीही साथ मिळाली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सहकार्यातून ‘सडक सुरक्ष जीवन रक्षा’ ही मोहीम राबवण्यात आली आणि याअंतर्गत तयार केलेली जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

या जाहिरातीतील ‘रोड किसी के बाप का नहीं,’ हा संवाद खूप गाजला. मूळची सोलापूरची असलेली सायली जाहिरात विभागात काम करत आहे. केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भरत दाभोलकर, किरण वेरणेकर, दिव्या राधाकृष्णन आणि सायली कुलकर्णी यांच्या टीमने अक्षयकुमारसह वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे व्हिडिओ तयार केले. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी आधी सविस्तर चर्चा केली. ही संकल्पना कशी अंमलात आणली आणि यात अक्षयने कसं योगदान दिलं त्याबद्दल स्वत: सायलीने सविस्तर माहिती दिली आहे. त्यासाठी पाहा हा व्हिडिओ..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 12:36 pm

Web Title: sayali kulkarni and her team are the brains behind akshay kumar road safety campaign ad
Next Stories
1 ‘आधार’ नसेल तरीही कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही: सुप्रीम कोर्ट
2 आधार विधेयकाला राज्यसभेच्या मंजुरीची आवश्यकता नाही!
3 Supreme Court Aadhaar card verdict: बँक खाते, मोबाईल नंबर व शाळांमधील आधारसक्तीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय
Just Now!
X