वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी या उद्देशाने सायली कुलकर्णी हिने तिच्या तीन साथीदारांच्या संकल्पनेतून एक मोहिम राबवण्यास सुरूवात केली. या मोहिमेत तिला परिवहन विभागाचीही साथ मिळाली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सहकार्यातून ‘सडक सुरक्ष जीवन रक्षा’ ही मोहीम राबवण्यात आली आणि याअंतर्गत तयार केलेली जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या जाहिरातीतील ‘रोड किसी के बाप का नहीं,’ हा संवाद खूप गाजला. मूळची सोलापूरची असलेली सायली जाहिरात विभागात काम करत आहे. केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भरत दाभोलकर, किरण वेरणेकर, दिव्या राधाकृष्णन आणि सायली कुलकर्णी यांच्या टीमने अक्षयकुमारसह वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे व्हिडिओ तयार केले. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी आधी सविस्तर चर्चा केली. ही संकल्पना कशी अंमलात आणली आणि यात अक्षयने कसं योगदान दिलं त्याबद्दल स्वत: सायलीने सविस्तर माहिती दिली आहे. त्यासाठी पाहा हा व्हिडिओ..

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sayali kulkarni and her team are the brains behind akshay kumar road safety campaign ad
First published on: 26-09-2018 at 12:36 IST