News Flash

‘अल्लाह’ म्हटल्याने योगाची शक्ती कमी होणार नाही; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी योगावर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर योगगुरू रामदेवबाबा यांनी उत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी योगावर वादग्रस्त विधान केले आहे (photo indian express)

जगभरात सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. भारतात वेगवेगळ्या ठीकाणी करोनाचे नियम पाळत योग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी योगावर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर योगगुरू रामदेवबाबा यांनी उत्तर दिले आहे. अभिषेक मनु सिंघवी योगा संदर्भात ओम आणि अल्लाहचा उल्लेख केला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट केले की, “ॐ चा जप केल्याने ना योग अधिक शक्तिशाली होईल आणि अल्लाह म्हटल्याने योगाची शक्ती कमी होणार नाही.”

हेही वाचा- Yoga Day 2021: योग अभ्यासाला सुरुवात कशी आणि कुठून करायची या गोंधळात असाल तर हे Videos पाहाच

अभिषेक मनु सिंघवी यांच्या या ट्विटवर रामदेवबाबा म्हणाले,  ‘ईश्वर-अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान’ अल्लाह, देव, खुदा सर्व एक आहेत, तर ॐ बोलण्यात काय हरकत आहे, परंतु आम्ही कोणालाही खुदा बोलण्यास मनाई करत नाही. या सर्वांनीही योग केले पाहिजेत, तर त्या सर्वांना एकच देव दिसेल, असे रामदेवबाबा म्हणाले. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

हेही वाचा- समजून घ्या : २१ जून रोजीच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही अभिषेक मनु सिंघवी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कॉंग्रेस नेते अशा प्रसंगी राजकारण का करतात आणि अशी विधाने का करतात हे मला माहित नाही. लसीकरण आणि योग हे दोन्ही करोनाविरूद्धच्या लढ्यात जीवनदायी आहेत. संपूर्ण जगात योगामुळे आपल्या देशाची आज एक वेगळी ओळख बनली आहे.

जगभरात साजरा होत आहे योग दिवस

आज सातवा योग दिवस जगभर साजरा केला जात आहे. भारताच्या नेतृत्त्वात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगासंदर्भात अनेक कार्यक्रम आज देशात आयोजित केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 11:47 am

Web Title: saying allah will not diminish power of yoga controversial statement of congress leader srk 94
Next Stories
1 जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्यासाठी सरकारचे आयोजन – अमित शाह
2 गुगल सर्च करून रचला हत्येचा कट! महाराष्ट्रातून घरी परतलेल्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवलं
3 देशात आढळले ५२,२५६ नवीन करोना रुग्ण; गेल्या ८८ दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या
Just Now!
X