19 September 2020

News Flash

एसबीआयच्या गृहकर्ज व्याजदरात कपात

रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतेच सर्व बँकांना गृहकर्जावरील व्याजदर कमी करण्याची सुचना केली होती.

| April 12, 2015 04:37 am

रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतेच सर्व बँकांना गृहकर्जावरील व्याजदर कमी करण्याची सुचना केली होती. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. सोमवार १३ एप्रिलपासून ही कपात लागू करण्यात येणार आहे.
एसबीआयने गृहकर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी कपात केल्याने आता गृहकर्जाचा व्याजदर महिलांसाठी ९.९५ टक्के आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी १० टक्के असणार आहे.   यापूर्वी एचडीएफसीने आपल्या व्याजदरात ०.२० टक्क्यांची कपात करत व्याजदर ९.९ टक्क्यांपर्यंत आणला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 4:37 am

Web Title: sbi cuts home loan interest rate by up to 0 25 percent
टॅग Sbi
Next Stories
1 मोदींच्या राफेल करारास काँग्रेसचा पाठिंबा
2 फ्रान्सच्या दौऱ्यात ‘जैतापूर’ला बळ
3 भारत फ्रान्सकडून ३६ ‘रफाल’ विमाने घेणार
Just Now!
X