स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. एसबीआयच्या एटीएममधून आता दिवसाला फप्क २० हजार रूपये काढता येणार आहे. डिजीटल व्यवहारांना चालणा देण्यासाठी एसबीआयने ४० हजार असणारी मर्यादा कमी करून २० हजार केली आहे. एसबीआय डेबिट कार्डच्या क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डधारकांसाठी असणार आहे.

एटीएमच्या माध्यमांतून होत असलेल्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि डिजीटल व्यवहारांना चालना मिळावा यासाठी पाऊल उचलल्याचे एसबीआयने सांगितले आहे. आगामी महिने सण-उत्सवांचे आहेत. या महिन्यात लोक आधीकाधिक एटीएमचा वापर करतात. आणि फसवणुकीचे शिकार होतात. अशा घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एसबीआयने स्पष्ट केलेय.

सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असलं तरी देशात कॅशची मागणी वाढत आहे. ज्या ग्राहकांना जास्त पैशांची गरज असेल, त्यांनी जास्त मर्यादा असलेले डेबिट कार्ड घ्यावेत, असा सल्ला पी. के. गुप्ता यांनी दिला आहे. खात्यात जास्तीत जास्त किमान रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना अधिक मर्यादेचं डेबिट कार्ड दिलं जातं.