देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. तर, मृत्यू संख्येत मोठी भर पडत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, लस आदींचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रूग्णांचे मृत्यू होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. एकूण रूग्णांचे मोठ्याप्रमाणवर हाल होताना दिसत आहे. करोनाविरोधातील या लढाईत भारताल मदत करण्यासाठी जगभरातील अनेक देश पुढे आले आहेत. तर, आता या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) करोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी ७१ कोटींची मदत जाहीर केली आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने भारतला कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ७१ कोटी रुपयांची मदत केली आहे. बँकेने १ हजार बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालयासाठी ३० कोटी रूपये दिले आहेत. तसेच, करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यांमध्ये २५० बेड आयसीयूच्या सुविधेबरोबरच आणखी १ हजार आयसोलेशन सुविधा असलेल्या बेडसाठी देखील आर्थिक मदत केली आहे. या सुविधा संबंधित शहारांमधील सरकारी रूग्णालयं आणि महानगरपालिकांच्या मदतीने निर्माण केल्या जातील. असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

हे खरं वसुधैव कुटुंबकम्! अमेरिकेपासून पाकिस्तानपर्यंत अनेक देशांचा भारताला मदतीसाठी पुढाकार!

अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, पाकिस्तान, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे. भारतात करोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन या देशांकडून दिलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे भारताला करोनाविरोधातलं युद्ध लढण्यासाठी मदत मिळू शकेल, असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला आहे.

करोना मृत्यूचा वेग कायम! पण २४ तासांत रुग्णसंख्येत घट

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा देशाला बसला असून, संसर्ग प्रसाराच्या वेगाने आरोग्य व्यवस्थेला वेठीस धरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत करोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. चार लाखांच्या पुढे रुग्णसंख्या नोंदवण्यात आली असून, गेल्या २४ तासांत यात घट झाल्याचं दिसून आलं. मात्र काळजीची बाब म्हणजे दररोज होणाऱ्या मृत्यू संख्येचा वेग कायम असल्याचं आकेडवारीवरून स्पष्ट झालं आहे.