News Flash

SBI चा निष्काळजीपणा, लाखो ग्राहकांचा बँक बॅलेन्स आणि महत्त्वाची माहिती लीक

एसबीआयने ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षेविना ठेवलं होतं

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचं खात असेल तर तुमची महत्त्वाची माहिती लीक झाल्याची भीती आहे. बुधवारी एसबीआयने ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षेविना ठेवलं होतं. मुंबईत असणाऱ्या या सर्व्हरमध्ये हजारो ग्राहकांची महत्त्वाची माहिती होती जी लीक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँक बॅलेन्स, खाती क्रमांक याच्यासहित काही महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय आहे.

टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, बँक सर्व्हरचा पासवर्ड टाकण्यास विसरलं होतं. यामुळे ज्यांना सर्व्हरमधून ग्राहकांची माहिती कशी मिळवली जाते याची कल्पना आहे त्यांनी याचा गैरवापर केल्याची शक्यता आहे. सर्व्हर किती वेळासाठी सुरक्षेविना होता याची माहिती मिळू शकली नाही. पण ज्यावेळी टेकक्रंचने एसबीआयशी संपर्क साधला तेव्हा ही समस्या सोडवण्यात आली होती. एसबीआयने याप्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही.

रिपोर्टनुसार, सुरक्षा नसलेला हा सर्व्हर हा बँकेच्या SBI Quick सेवेचा भाग होता. यावरुन ग्राहक सामान्य माहिती मिळवण्यासाठी मेसेज किंवा मिस कॉल देऊन ती माहिती मिळवू शकतात. बँकेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, SBI Quick – MISSED CALL BANKING ही मोफत सेवा असून तुम्ही तुमचा बॅलेन्स, मिनी स्टेटमेंट आणि इतर माहिती आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन एसएमएस किंवा मिस कॉल देऊन मिळवू शकता.

SBI Quick सेवा थेट ग्राहकांच्या मोबाइल फोनशी संलग्न असल्याने सर्व्हरमधून लीक झालेला डाटा वापरत खात्यातील पैशांची अफरातफर होण्याची भीती आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 5:07 am

Web Title: sbi leaked data of million customers
Next Stories
1 VVIP chopper scam: अजून एक आरोपी भारताच्या हाती, राजीव सक्सेनाचं दुबईहून भारतात प्रत्यार्पण
2 गायक राहत फतेह अली यांना परकीय चलनप्रकरणी नोटीस
3 विरोधक सत्तेत आल्यास रोज नवा पंतप्रधान- अमित शहा
Just Now!
X