12 December 2018

News Flash

‘मिनिमम बॅलन्स’ न ठेवल्याने एसबीआयने बंद केली ४१.१६ लाख बचत खाती

माहितीच्या अधिकारात माहिती समोर

प्रतिनिधिक छायाचित्र

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने ४१.१६ लाख बचत खाती बंद केली आहेत. १ एप्रिल ते ३१ जानेवारी या कालावधीत ज्या खात्यांना मिनिमम बॅलन्सही ठेवता आलेला नाही अशी ही खाती आहेत. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात महिन्याचा मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या किंवा मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम ठेवणाऱ्या बचत खात्यांसाठी दंडाचे शुल्क कमी केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दंडाचे हे शुल्क आणखी कमी केले होते. तरीही मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम किंवा रक्कमच नाही अशी सुमारे ४१.१६ लाख बचत खाती एसबीआयने बंद केली आहेत. ‘लाइव्हमिंट डॉट कॉम’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

एसबीआयमध्ये सुमारे ४१ कोटी बचत खाती आहेत. ज्यापैकी १६ कोटी बचत खाती ही प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत येतात. प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत येणाऱ्या बचत खाती, सेवानिवृत्त लोकांची बचत खाती, अल्पवयीन बचत खाती यांना मिनिमम बॅलन्सच्या अटीतून सूट देण्यात आली आहे. तर मंगळवारपासून स्टेट बँकेने बचत खातेदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ठराविक शिल्लक अर्थात मिनिमम बॅलन्सपेक्षा आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत ७५ टक्के कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या नव्या निर्णयाचा फायदा एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना होणार आहे.

 

First Published on March 14, 2018 4:12 am

Web Title: sbi shuts 41 2 lakh savings accounts for not keeping minimum balance