News Flash

भेसळयुक्त दूधविक्रीबद्दल सर्वोच्च न्यायालयाला चिंता

देशात भेसळयुक्त दूधाची खुलेआम विक्री होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली आणि तातडीने उपाय योजून ही विक्री बंद करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

| July 2, 2013 01:20 am

देशात भेसळयुक्त दूधाची खुलेआम विक्री होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली आणि तातडीने उपाय योजून ही विक्री बंद करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.
भेसळयुक्त दूधविक्रीप्रकरणी दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारांना खडे बोल सुनावले. हा विषय अतिशय गंभीर आहे. देशामध्ये सगळीकडे भेसळयुक्त दूधाची विक्री होते आहे. सरकारने ही विक्री थांबवण्यासाठी काय उपाययोजना केली, असा प्रश्न न्या. के. एस. राधाकृष्णन आणि न्या. पिनाकी चंद्रा घोष यांनी उपस्थित केला.
हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारित येत असल्याचे केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने या संदर्भातील जनहित याचिकेच्या मसुद्यात सर्वच राज्य सरकारांना प्रतिवादी करण्याचा निर्णय घेतला. येत्या ३१ जुलैपर्यंत राज्य सरकारांना त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 1:20 am

Web Title: sc asks state govts to curb sale of adulterated milk 2
टॅग : Supreme Court
Next Stories
1 इशरत जहॉं चकमक: ‘सीबीआय तपास अधिकाऱयांना अधिक सुरक्षा द्या’
2 अकार्यक्षम उत्तराखंड सरकार बरखास्त करा – सुषमा स्वराज
3 सीबीआय स्वायत्तता: सरकारचा इलाज रोगापेक्षा भयंकर – जेटलींची टीका
Just Now!
X