News Flash

“तिच्याशी लग्न करशील का?,” या विधानाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून भूमिका स्पष्ट

आंतरराष्ट्रीय महिला दिनी सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले

(संग्रहित छायाचित्र)

“तु तिच्याशी लग्न करशील का?” असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात एका बलात्काराच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान म्हटले होते. याचे स्पष्टीकरण देताना सोमवारी न्यायालयाने सांगितले की, ही अशी संस्था आहे जी “महिलांचा सर्वात जास्त आदर” करते.

सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की, न्यायपालिकेची प्रतिष्ठा वकिलांच्या व बारच्या ताब्यात आहे आणि या खटल्यावरील निरीक्षणे पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने नोंद करण्यात आली आहेत.

न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे निरीक्षण केले होते. १४ वर्षांच्या बलात्कार पीडित गर्भवती मुलीचा जवळजवळ २६ आठवड्यांच्या गर्भाचा पात करण्यास मंजुरी देण्याच्या प्रकरणाची सुनावणी होती.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले. बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला पीडित मुलीशी लग्न करशील का? असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. या वक्तव्यामुळे न्यायालयावर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर असे स्पष्टीकरण देण्यात आले.

“तिच्याशी लग्न करणार का?,” शाळकरी मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला सुप्रीम कोर्टाचा सवाल

गेल्या आठवड्यात एका सरकारी कर्मचाऱ्याने बलात्काराच्या आरोपाखाली होणारी अटक रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता, कोर्टाने आरोपीला तिच्याशी लग्न करणार का? अशी विचारणा केली.

याचिकाकर्त्याने आपण आपली सरकारी नोकरी गमावू शकतो असं कोर्टात सांगितलं. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्याला विचारलं होतं की, “जर तू लग्न करणार असशील तर आम्ही मदत करु शकतो. जर नाही, तर तुझी नोकरी जाईल आणि तुला जेमलध्ये जावं लागेल. मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी याचा विचार करायला हवा होता”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 6:17 pm

Web Title: sc clarifies itself amid row over comments in rape case sbi 84
Next Stories
1 Batla House Encounter : दिल्ली न्यायालयाने अरिझ खानला दोषी ठरवले
2 ग्रामीण महिलांमधून उद्योजक घडवण्यासाठी गुगल मदत करणार; पाच लाख डॉलरचे अनुदान
3 फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रियापाठोपाठ आता स्वित्झर्लंडमध्येही ‘बुरखा बंदी’; जनमत चाचणीनंतर घेतला निर्णय
Just Now!
X