19 September 2020

News Flash

INX media case : चिदंबरम यांना झटका; अटकपूर्व जामिनावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

INX media प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली होयकोर्टाने यापूर्वी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, जर कोणत्याही तपास यंत्रणेने कोणत्याही आरोपांविरोधात चौकशीसाठी कोणाला अटक केली असेल तर त्याची अटकपूर्व जामीन याचिका आपोआपच निष्प्रभ्र होऊन जाते. जर आपल्याला जामीन हवा असेल तर त्यासाठी योग्य त्या कोर्टात जावं, असा सल्लाही कोर्टाने चिदंबरम यांच्या वकिलांना दिला.

INX media भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडी देखील चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करु शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 12:23 pm

Web Title: sc dismisses appeal filed by congress leader p chidambaram in inx media case aau 85
Next Stories
1 मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढली, मोदी सरकारचा निर्णय
2 “काश्मीरच्या राज्यपालांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करा”
3 ‘काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाहीये’, या राहुल गांधींच्या आरोपात तथ्य आहे का?, नोंदवा तुमचे मत
Just Now!
X