News Flash

आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना सीबीआयच्या विशेष संचालकपदी कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडाच्या विशेष तपास पथकाचे नेतृत्त्व केले होते

Rakesh Asthana: अस्थाना हे १९८४च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पूर्वी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर होते.

आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हे केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विशेष संचालकपदी कायम राहतील. अस्थाना यांना सीबीआयच्या विशेष संचालकपदी नेमण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची नियुक्ती नियमानुसार झालेली आहे. त्यांच्या नियुक्तीला सीबीआयच्या संचालकांचाही विरोध नसल्याचे मागील सुनावणीवेळी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते.

कॉमन कॉज नावाच्या स्वंयसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत अस्थाना यांची नियुक्ती अवैध आणि नियमबाह्य असून सरकारचा हा निर्णय रद्द करावी अशी मागणी केली होती. प्राप्तिकर विभागाला मिळालेल्या डायरीत अस्थाना यांच्यावर आरोप होते आणि सीबीआयच्या संचालकांनी निवड समितीसमोर आपला आक्षेप नोंदवला होता, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

अस्थाना हे १९८४च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पूर्वी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर होते. त्यांच्या अधिकारांतर्गत ११ क्षेत्रांचा समावेश होता. ऑगस्टा वेस्टलँड, किंगफिशर, मोईन कुरेशी आणि हसन अलीसारख्या अनेक हायप्रोफाईल घोटाळ्यांची ते चौकशी करत होते. अस्थांनांनी फेब्रुवारी २००२च्या गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडाच्या विशेष तपास पथकाचे नेतृत्त्वही केले होते. त्याचबरोबर त्यांचा बिहारमधील चारा घोटाळ्याच्या तपास प्रक्रियेतही महत्त्वाचा सहभाग होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:00 pm

Web Title: sc dismisses plea challenging rakesh asthanas appointment as cbi special director
Next Stories
1 भाजप खासदार वरुण गांधी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसवासी होणार?
2 दहशतवाद्यांच्या यादीतून नाव हटवा; हाफिज सईदची संयुक्त राष्ट्राकडे मागणी
3 आतापर्यंत भारतातील १०० तरुण आयसिसमध्ये दाखल
Just Now!
X