स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद यांना बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणी करावी लागणार आहे. ही चाचणी करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. त्याचबरोबर २०१० मध्ये झालेल्या या बलात्काराच्या प्रकरणात पौरुषत्वाची चाचणी करण्यास इतका वेळ का लावला, असा सवालही न्यायालयाने पोलिसांना विचारला.
न्या. रंजना प्रकाश देसाई यांनी स्वामी नित्यानंद यांच्याकडून दाखल झालेल्या याचिकेवरून त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. त्याचबरोबर कर्नाटक सरकारचा निकालही न्यायालयाने कायम ठेवला. बलात्काराच्या प्रकरणांत अशा पद्धतीच्या चाचण्या अलीकडच्या काळात आवश्यक झाल्या आहेत. मग स्वामी नित्यानंद त्याला का विरोध करीत आहेत, असा सवाल न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी विचारला होता. त्याचबरोबरही चाचणी करण्यासाठी इतका वेळ का लावला, असा सवाल न्यायालयाने पोलीसांना विचारला.