News Flash

सर्वोच्च न्यायालयाकडून विजय मल्यांना अवमान खटल्याची नोटीस

गेल्याच महिन्यात विजय मल्या यांना विशेष न्यायालयाने ‘फरारी आरोपी’ म्हणून घोषित केले होते.

Vijay Mallya :हॅकरने काही लिंक दिल्या असून त्यात मल्ल्याची संपत्ती, व्यवसाय, पासपोर्ट आदींची माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मद्यसम्राट विजय मल्या यांच्याविरोधात नोटीस जारी केली. मल्या यांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील जाहीर न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अवमानाचा खटला चालवावा, यासाठी बँकांनी केलेल्या याचिकेवरून मल्ल्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. स्टेट बँकेच्या नेतृत्त्वाखालील बँकांच्या समुहाने यापूर्वी मल्या यांचा ४ हजार कोटींच्या तडजोडीचा प्रस्ताव फेटाळला होता. मल्या सध्या सक्तवसुली संचलनालय (ईडी), उच्चस्तरीय फसवणुकीच्या गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या ‘एसएफआयओ’ यांसारख्या तपासयंत्रणांच्या रडारवर आहेत. गेल्याच महिन्यात विजय मल्या यांना विशेष न्यायालयाने ‘फरारी आरोपी’ म्हणून घोषित केले होते. मल्या यांनी १३ मार्च रोजी बँकांच्या समुहाने किंगफिशर एअरलाईन्सकडून २०१३ पासून २,४९४ कोटी रूपये वसूल केल्याचा दावा केला होता. याशिवाय, आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्या याची मुंबई आणि बंगळुरू येथील १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली होती. या मालमत्तेत मल्याचे ३४ कोटी रुपयांची बँकेतील रोख रक्कम, मुंबई आणि बंगळुरू येथील घरे अनुक्रमे १३०० आणि २२९१ चौरस फुटाची घरे, चेन्नई येथील ४.५ एकरचा औद्योगित भूखंड, कूर्ग येथील २८.७५ एकरवरील कॉफीची बागायत, युबी सिटी आणि बंगळुरू येथील निवासी तसेच औद्योगिक बांधकामे आदींचा समावेश आहे. विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवणारा मल्या यांनी कारवाईच्या भीतीने २ मार्च रोजी भारत सोडून पळून गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:38 pm

Web Title: sc issues notice to vijay mallya on bank plea seeking contempt proceedings
Next Stories
1 प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या YAHOO ची होणार विक्री!
2 Video : गाडीतून बाहेर पडलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार!
3 ‘आप’चे भगवंत मान यांना संसदेत उपस्थित न राहण्याची सूचना
Just Now!
X