22 September 2020

News Flash

याकुबची फाशी कायम ठेवणाऱया न्यायमूर्तींना धमकीचे पत्र, सुरक्षा वाढवली

याकुब मेमनची फाशीची शिक्षा कायम ठेवणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना शुक्रवारी अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र आले आहे.

| August 7, 2015 11:08 am

याकुब मेमनची फाशीची शिक्षा कायम ठेवणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना शुक्रवारी अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र आले आहे. या पत्राच्या पार्श्वभूमीवर दीपक मिश्रा यांच्या घराभोवती सुरक्षा वाढविण्यात आली असून, दिल्ली पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली असून दिल्ली पोलीसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
याकुब मेमनला फाशी देण्याचा निर्णय तीन सदस्यीय खंडपीठाने कायम ठेवला होता. या तीन सदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा अध्यक्ष होते. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती प्रफुल्लचंद्र पंत आणि न्यायमूर्ती अमितवा रॉय यांचाही समावेश होता. हा निकाल दिल्यानंतर लगेचच या तिन्ही न्यायमूर्तींच्या घराभोवतीची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती. दिल्ली पोलीसांचे अधिकारी सातत्याने या तिन्ही न्यायमूर्तींच्या घराभोवती गस्त घालत असून, घराभोवती आणि त्यांच्या सोबत असलेल्या सुरक्षारक्षकांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
याकुब मेमनला गेल्या महिन्यात ३० तारखेला नागपूरमधील कारागृहात फासावर लटकविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2015 11:08 am

Web Title: sc judge who rejected yakub memons mercy plea receives threat letter
टॅग Yakub Memon
Next Stories
1 कसाबच्या दहशतवादी संघटनेतून नावेदचे प्रशिक्षण! 
2 चकमकीत ठार झालेला तो दहशतवादी उच्चशिक्षित तरूण
3 पाकिस्तानातील राष्ट्रकुल परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा भारताचा इशारा
Just Now!
X