News Flash

राजीव मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा तामिळनाडू सरकारचा निर्णय हा अयोग्य असून हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत,

| February 21, 2014 02:43 am

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा तामिळनाडू सरकारचा निर्णय हा अयोग्य असून हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या तीन आरोपींच्या सुटकेला स्थगिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्चला होणार आहे.
सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने राज्य सरकारला तीन आरोपींबाबत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या तीन आरोपींची फाशी रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. या हत्या प्रकरणातील अन्य चार आरोपींची फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली असून त्यांच्याबाबत केंद्र सरकारने नव्याने याचिका सादर करावी, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
या आरोपींच्या सुटकेला स्थगिती देण्याबाबत कोणताही आदेश देण्यात येऊ नये, अशी विनंती तामिळनाडू सरकारच्या वतीने करण्यात आली. तेव्हा आम्ही राज्य सरकारच्या अधिकारांना कमी लेखत नाही तर केवळ योग्य पद्धतीबाबत आग्रही आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तामिळनाडू सरकारने सुटकेचा हा निर्णय घेताना मात्र कायद्यातील प्रचलित पद्धतीचा अवलंब केला नाही. शिक्षा रद्द करण्याचा राज्यांचा अधिकार काढून घेण्याची न्यायालयाची इच्छा नाही, मात्र योग्य कार्यपद्धतीचा पाठपुरावा राज्यांनी केलाच पाहिजे, असेही पीठाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने उपस्थित केलेले अन्य मुद्देही तपासण्यात येतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
आरोपी  निराश
आपल्या सुटकेला स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याचे कळताच आरोपींच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. जवळपास २३ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर सुटकेची स्वप्ने रंगवत असलेल्या मुरुगन, संथन, पेरारीवलन आणि नलिनी या आरोपींच्या चेहऱ्यावर क्षणार्धात नैराश्य पसरले, असे वेल्लोर कारागृहातील सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 2:43 am

Web Title: sc restrains tn govt from releasing prisoners
Next Stories
1 मोदी, केजरीवाल, ममता, लालूप्रसाद आणि अखिलेश यांच्याशी करा ‘फेसबुक चॅट’!
2 युक्रेनमधील आंदोलकांवर रशियाची टीका
3 अनुदानित सिलिंडरसाठी आधार कार्डची गरज नाही – केंद्र सरकार
Just Now!
X