18 January 2019

News Flash

‘सर्वाधिक जागांपेक्षा आवश्यक जागा असलेल्या पक्षांना सत्ता स्थापन करता येते’

निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षापेक्षा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक जागा असणे गरजेचे असल्याचे, काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुप्रीम कोर्टाच्या हवाल्याने म्हटले आहे.

निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षापेक्षा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक जागा असणे गरजेचे असल्याचे, काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुप्रीम कोर्टाच्या हवाल्याने म्हटले आहे.

निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षापेक्षा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक जागा असणे गरजेचे असल्याचे, काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुप्रीम कोर्टाच्या हवाल्याने म्हटले आहे. त्यामुळे मॅजिक फिगरसाठी आम्ही जेडीएसला पाठिंबा दिला असून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा प्रस्तावही पाठवल्याचे त्यांनी सांगितले.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. यात भाजपा सर्वाधिक १०३ जागा जिंकून मोठा पक्ष ठरला असला तरी तो बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे काँग्रेसने तातडीने हालचाल करीत जेडीएसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ७८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने ३७ जागा जिंकणाऱ्या जेडीएसला सोबत घेऊन ११५ ही मॅजिक फिगर गाठली आहे. त्यामुळे त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तेव्हा भाजपाने स्थानिक पक्षांशी युती करीत सत्ता स्थापनेचा दावा करुन काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले होते. त्याची पुनरावृत्ती आता काँग्रेसने भाजपासोबत खेळी करुन केली आहे.

दरम्यान, युती झालेल्या काँग्रेसच्या आणि जेडीएसच्या विजयी आमदारांची उद्या (बुधवारी) बैठक बोलावल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. त्यानंतर बैठकीत सत्ता स्थापनेबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल काँग्रेसच्या प्रस्तावावर काय निर्णय देतात त्यावरुन कर्नाटकात कोण सत्तेत येणार आणि मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब होईल.

First Published on May 16, 2018 1:48 am

Web Title: sc said after goa election that group having more seats than required are invited we have 117 seats says siddarmaiah