04 August 2020

News Flash

माध्यमांना लगाम घालणाऱया ‘आप’च्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

दिल्लीतील आम आदमी सरकारने देशातील माध्यमांना लगाम लावण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाला गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

| May 14, 2015 01:03 am

दिल्लीतील आम आदमी सरकारने देशातील माध्यमांना लगाम लावण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाला गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. दिल्ली सरकार आणि मंत्र्यांची बदनामी केल्यास माध्यमांवर बदनामीचा ठपका ठेवून खटला चालवण्याचे परिपत्रक ६ मे रोजी आप सरकारने जारी केले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना फटकारले असून असा अध्यादेश काढण्याची गरज काय? याचे स्पष्टीकरण देण्यास न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना सांगितले आहे. माध्यमांना लगाम घालणारे अशाप्रकराचे परिपत्रक केजरीवाल कसे काय काढू शकतात असा सवाल उपस्थित करत अमित सिब्बल यांनी दिल्ली सरकारच्या अद्यादेशाला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारच्या या जाचक अध्यादेशाला स्थगिती देत यावर दिल्ली सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे. तसेच याआधी केजरीवाल यांनी स्वतःच त्यांच्यावर दाखल असलेल्या एका अब्रुनुकसानीच्या खटल्याला आव्हान देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा दावा केला होता. मग, एकाच वेळी केजरीवाल दोन भूमिका कसे काय घेऊ शकतात? असेही निरीक्षण या निर्णयाला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2015 1:03 am

Web Title: sc stays delhi govt circular on initiating proceedings against media houses
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 बांगलादेशात तिसऱ्या ब्लॉगरची कोयत्याने वार करून हत्या
2 लोकसभा अध्यक्षांच्या नि:पक्षपातीपणावर सवाल
3 पिकासोच्या चित्राला लिलावात विक्रमी किंमत
Just Now!
X