मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी दोषी ठरवून बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याविरुद्ध त्याने केलेल्या फेरविचार याचिकेची शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
न्या. पी. सदाशिवम आणि न्या. बी. एस. चौहान यांच्या पीठाने २१ मार्च रोजी संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेची सुनावणी उद्या न्यायमूर्तीच्या दालनात होणार आहे. या बॉम्बस्फोट मालिकेतील अन्य आरोपी युसुफ नळवाला, खलील अहमद सय्यद अली नझर, मोहम्मद दाऊद युसुफ खान, शेख आसिफ युसुफ, मुझम्मील कादरी आणि मोहम्मद शेख यांनीही फेरविचार याचिका केल्या आहेत.