अत्यंत संवेदनक्षम नितीश कटारा हत्याकांडातील (२००२) आरोपी विकास यादव, त्याचा भाऊ विशाल आणि सुखदेव पहेलवान यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले. आपल्या देशात गुन्हेगारच न्याय मिळण्यासाठी रडत असतात, असे मतही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. दिल्ली उच्च न्यायालय आणि अन्य न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. तथापि, उच्च न्यायालयाने या तिघांना दिलेल्या शिक्षेबाबतच केवळ विचार करण्याचे मान्य केले. या आरोपींची जन्मठेपेची शिक्षा ३० वर्षे केली. न्या. जे. एस. केहार आणि न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या पीठाने दोन तास वकिलांचा युक्तिवाद ऐकला आणि उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.