12 July 2020

News Flash

चायनिज पदार्थ खाल्ल्यास Coronavirus होईल का? हॉटेल्समध्ये विचारला जातोय प्रश्न

काही हॉटेल्समध्ये चायनिज पदर्थांची मागणीही घटल्याचे दिसतेय

कोरोना व्हायरसमुळे सध्या सगळीकडेच चीनचा माल, चीनमधील लोक आणि चायनिज पदार्थ यांच्याकडे शंकेच्या नजरेनं पाहिलं जातंय. आता तर अगदी कोपऱ्या कोपऱ्यावर मिळणाऱ्या चायनिज पदार्थांबद्दलही शंका घेतली जात आहे. काही हॉटेल्समध्ये चायनिज पदर्थांची मागणीही घटल्याचे दिसत आहे.

तुम्ही चीनमध्ये तयार होणारी चिली बीन पेस्ट किंवा चीनमधून येणारे काही मसाले तुम्ही चायनिज पदार्थ तयार करताना वापरता का? असा प्रश्न हॉटेलमध्ये आता ग्राहक विचारताना दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, काही हॉटेल मालक सांगताहेत की, लोक चायनिज पदार्थ खाण्यास नकार देत आहेत. त्यांना भीती आहे की, यातून त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होईल.

खाद्य पदार्थांची आयात करणारेही या नव्या व्हायरसमुळे सतर्क झाले आहेत. फोरम ऑफ इंडियन फूड इम्पोर्टर्सचे संस्थापक संचालक अमित लोहानी यांनी सांगितले की, ”चीनमधून मागवलेले पदार्थ लोकांनी आता थांबवले आहेत. शिवाय लोक तिकडे जाण्याचेही टाळत आहेत. या व्हायरसच्या भीतीचा मोठा परिणाम होत आहे. शिवाय हा परिणाम दीर्घकाळ राहील, अशी शक्यताही आहे. त्यामुळे चायनिज पदार्थांच्या किमतीही वाढू शकतात.”

मेड-इन-चायना पदार्थांची खरेदी टाळण्यास काही रेस्तराँनी सुरुवात केली आहे. त्यांनी आता अशा पदार्थांना पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. स्पेशालिटी रेस्टॉरंट्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अंजन चॅटर्जी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, त्यांच्या सर्व रेस्टॉरंट्समध्ये वापरले जाणारे ९० पदार्थ भारतात तयार झालेले असतात. केवळ १० टक्के पदार्थ चायनिज असतात. तेही केवळ स्पेश सॉसच्या स्वरूपात असतात. परंतु, आता ते पदार्थही सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशिया येथून मागवण्यात आले आहेत.

पदार्थांमुळे कोरोना व्हायरस होतो का?
डॉ. पद्मजा केसकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितल्यानुसार, जर कोणताही पदार्थ योग्यरित्या शिजवल्यास त्यातून कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याची भिती नसते. केवळ भांडी आणि कपड्यांमधून संसर्ग पसरू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 1:38 pm

Web Title: scare chinese food restaurants face heat over ingredients pkd 81
टॅग China,India China
Next Stories
1 प्रेमप्रकरण : महिला पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करून त्यानं स्वतःला संपवलं
2 ‘या’ परदेशी नागरिकांना भारतात येण्यास बंदी, कारण…
3 थायलंडमध्ये सैनिकाच्या बेछूट गोळीबारात १७ ठार
Just Now!
X