करोना व्हायरसचा संसर्ग होईल या भीतीमुळे एका मुलाने स्वतःच्या आईचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये एका करोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबियांनी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले. ‘अंत्यसंस्कारावेळी करोनाच्या संसर्गापासून बचावाची खबरदारी घेतली जाईल आणि त्यासाठी आवश्यक संरक्षणात्मक साहित्य पूरवले, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही मुलाने आणि कुटुंबियांनी महिलेचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला’, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लुधियानाच्या शिमलापुरी गावातील करोनाग्रस्त ६९ वर्षीय महिलेचा सोमवारी(दि.६) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह प्रशासनाने तिच्या कुटुंबियांना सोपवण्याची तयारी केली, मात्र करोनाची लागण होईल या भीतीने मृत महिलेच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. “संसर्ग होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जाईल आणि आवश्यक संरक्षणात्मक साहित्य पूरवले जाईल ज्यामुळे संसर्गापासून बचाव होईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही महिलेच्या मुलाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला”, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त इकबाल सिंह संधू यांनी दिली.

“मृतदेह स्वीकारण्यासाठी मुलाने आणि उर्वरित कुटुंबियांनीही नकार दिल्याचा मोठा धक्का बसला. आम्ही दोन वेळेस त्यांच्याशी संपर्क साधला पण करोनाचा संसर्ग होईल या भीतीमुळे त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. अखेर जिल्हा प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक आले होते, पण त्यांनी १०० मीटर अंतरावरुनच अखेरचा निरोप दिला”, अशी माहिती संधू यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scared of catching coronavirus infection son refuses to cremate mother in punjab ludhiana sas
First published on: 08-04-2020 at 08:26 IST