News Flash

प्रसिद्ध अभिनेता केविन क्लार्कचा अपघातात मृत्यू

वयाच्या ३२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘स्कूल ऑफ रॉक’ या चित्रपटामध्ये ड्रमर स्पॅजी मॅक्गीची भूमिका साकारणारा अभिनेता केविन क्लार्कचा अपघातात मृत्यू झाला आहे. वयाच्या ३२व्या वर्षी केविनने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याला श्रद्धांजली वाहत आहे.

२६ मे रोजी शिकागोच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना एका कारने त्याला धडक दिली. या अपघातामध्ये केविनचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार जोरात येऊन धडकल्यामुळे केविनचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिनेता जॅक ब्लॅकने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jack Black (@jackblack)

जॅक ब्लॅकने इन्स्टाग्राम अकाऊंटवर केविनसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘धक्कादायक बातमी. केविनचे निधन झाले आहे. माझा यावर विश्वासच बसत नाही.. श्रद्धांजली..’ या आशयाचे कॅप्शन जॅकने दिले आहे. केविन आणि जॅकने २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्कूल ऑफ रॉक’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 4:55 pm

Web Title: school of rock movie actor kevin clarke dies in road accident avb 95
Next Stories
1 मोदी २.० सरकार सर्व्हे: करोना लाटेमुळे मोदी लाट ओसरणार?; आज निवडणुका झाल्यास…
2 ‘बाप’ काढणाऱ्या रामदेव बाबांविरोधात डॉक्टरांचा संताप; पोलिसांत गुन्हा दाखल
3 रिपब्लिक बांगलाच्या पत्रकारावर गुन्हा; CBI अधिकारी बनून मागत होता खंडणी
Just Now!
X