News Flash

भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकांची हत्या

शाळेत वर्ग चालू असताना विद्यार्थ्यांसमोरच मुख्याध्यापकांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली.

प्रतिनिधिक छायाचित्र

शाळेत वर्ग चालू असताना विद्यार्थ्यांसमोरच मुख्याध्यापकांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. बंगळुरुमधील आग्रहारा दासाराहाल्ली भागातील हवनपूर पब्लिक स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. विद्यार्थ्यांना महत्वाच्या विषयावर शिकवायचे असल्याने मुख्याध्यापक रंगनाथ (६०) यांनी विशेष वर्ग बोलावला होता.

ते वर्गात शिकवत असताना सहाजण तिथे आले व त्यांनी धारदार शस्त्राने रंगनाथ यांची हत्या केली. त्यानंतर मारेकरी लगेच गाडीत बसून पसार झाले. हल्लेखोरांपैकी एकाला महालक्ष्मी लेआऊट भागातून नंतर अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना या मारेकऱ्याला पकडण्यासाठी गोळीबार करावा लागला. पायाला गोळी लागल्याने हा हल्लेखोर जखमी झाला. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 10:31 am

Web Title: school principal killed in front of his students
Next Stories
1 सिद्धूंनी पाकिस्तानच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झाले पाहिजे’
2 हरयाणातील मशिदीला हाफीज सईदच्या ‘लष्कर- ए- तोयबा’ची रसद
3 पेट्रोलचे दर स्थिर तर डिझेल ९ पैशांनी महागले
Just Now!
X