बिहारमधील ज्या शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले होते, त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने बुधवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. सरणमधील शाळेतील २३ विद्यार्थी माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्यामुळे मृत्युमुखी पडले होते. या अन्नामध्ये किटकनाशके असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
विषबाधेची घटना घडल्यापासून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका मीना देवी या आपल्या पतीसह फरार झाल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंटही जारी केले होते. मीना देवी यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि १०२-ब (गुन्हेगारी कट रचणे)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.