News Flash

पाकिस्तानात शाळकरी विद्यार्थिनीची वर्गात आत्महत्या

शाळेत जाता येता त्रास देणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून १०वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने परीक्षेदरम्यान भर वर्गात स्वतला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना पाकिस्तानमध्ये बुधवारी घडली. वर्गात

| April 12, 2013 01:01 am

शाळेत जाता येता त्रास देणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून १०वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने परीक्षेदरम्यान भर वर्गात स्वतला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना पाकिस्तानमध्ये बुधवारी घडली. वर्गात अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.नताशा हबिब (१६) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. इस्लामाबादपासून ६० किमी अंतरावर असणाऱ्या हरिपूर येथे शासकीय मुलींची शाळा आहे. मृत्यूपूर्वी आपल्या उजव्या हातावर लिहिलेल्या मजकुरात नताशाने आपल्या आईची माफी मागितली आहे. तसेच असद नावाची व्यक्ती आपल्याला सतावत असल्यामुळे आपण निराश झालो होतो. त्याच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे तिने नमूद केले होते. याशिवाय तिने डाव्या हातावर एक मोबाइल क्रमांकही लिहून ठेवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:01 am

Web Title: schoolgirl commits suicide in pakistan
Next Stories
1 सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी सुरक्षेत निष्काळजीपणा, १३ पोलिस कर्मचाऱयांचे निलंबन
2 चिदम्बरम यांच्यासोबतची बैठक रद्द करून ममता बॅनर्जी माघारी
3 आराक्कोणमजवळ रेल्वेगाडी घसरून १ ठार, ३३ जखमी
Just Now!
X